Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon

Student Forum

विद्यार्थिनी मंच

आपल्या महाविद्यालयात 1997 पासून “विद्यार्थिनी मंच ” कार्यरत आहे. या विद्यार्थिनी मंच अंतर्गत दरवर्षी नवनवीन विषयावर तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते. तसेच विद्यार्थिनींच्या विविध समस्या या मंचा अंतर्गत सोडवल्या जातात आणि विद्यार्थिनींना भय मुक्त वातावरणात शिक्षण कसे घेता येईल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा विद्यार्थिनी मंच सतत कार्यरत असतो. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थिनी मंचची रचना केलेली आहे.

या विद्यार्थिनी मंच मध्ये तिन्ही शाखेतील तीन विद्यार्थिनींची नियुक्ती विद्यार्थिनी मंचच्या सदस्य म्हणून केली जाते. त्यांच्याकडून विद्यार्थिनींच्या काही समस्या असतील तर त्या माहीत करून घेतल्या जातात आणि त्या सोडवल्या जातात तसेच काही विद्यार्थिनी आपल्या समस्या विद्यार्थिनी मंचच्या सदस्यांकडे सांगत नाहीत, तर त्या घरी आपल्या आईकडे सांगतात म्हणून विद्यार्थिनी मंच मध्ये दोन पालक सदस्यांची देखील नियुक्ती केलेली जाते आणि दरवर्षी पालक सदस्यांना विद्यार्थिनी मंचच्या उद्घाटन आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रित केले जाते व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर त्या मन मोकळेपणाने पणाने कार्यक्रमात मांडाव्यात असे सांगितले जाते. परंतु आजपर्यंत एकाही पालकांकडून त्यांच्या पाल्याची तक्रार आलेली नाही. अशा रीतीने हा विद्यार्थिनी मंच विद्यार्थिनींच्या विकासासाठी व त्यांना आत्मनिर्भर पणे वावरण्यासाठी सतत कार्यरत असतो.