Nutan Vidya Prasarak Mandal's Arts, Commerce & Science College, Lasalgaon
Lasalgaon, Nashik, (M.S.) E- Mail - iqaclasalgaon@gmail.com ; AISHE : C- 41375
Course & Syllabus
PSOs, Cos- Program Specific Outcomes & Course Outcomes of Marathi . Name of Program (with Specialization) – B.A.Marathi (PSO)
मराठी विभाग उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे–
PSO1 राजभाषा मराठीबद्दल जागरुकता वाढेल.
PSO2 मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध आणि गौरवशाली परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख होईल.
PSO3 विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होईल.
PSO4 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होईल.
PSO5 विद्यार्थ्यांमध्ये जीवनाची मूल्ये रुजतील.
PSO6 अभ्यासक्रम आणि त्याचा जीवनाचा परस्परसंवादी उपयोग यांच्यातील संबंध स्पष्ट करता येईल.
FYBA CC-A (सामान्य स्तर–१) चे Outcomes पुढीलप्रमाणे
Sem-I मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्यविकास / Sem-II मराठी साहित्य: एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास
CO1. मराठी साहित्य, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा क्रमश: परिचय करून घेतील.
CO2. मराठी साहित्यासंबंधी रुची निर्माण होईल.
CO3.वाड्:मयीन अभिरुचीचा विकास होईल.
CO4. मराठी साहित्यातील भिन्न भिन्न वाड्:मयीन प्रवाह व प्रकार लक्षात येतील.
CO5. विविध भाषिक क्षेत्रांतील कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल.
CO6. मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्ये जाणून घेण्यास मदत होईल.
प्रथम वर्ष कला
सत्र १ SEC-101-MAR उपयोजित मराठी लेखनकौशल्ये
सत्र 2 SEC-151-MAR व्यावसायिक मराठी लेखनकौशल्ये
CO1. मराठी भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचा परिचय होईल.
CO2. जीवनव्यवहारातील भाषेच्या उपयोजनाच्या कौशल्यांची जाण प्राप्त होईल.
CO3. बातमी लेखन,भाषण संहिता लेखन ,संवाद लेखन/मुलाखत लेखन,अर्ज व पत्रलेखन अशा स्वरूपाचे लेखन करता येईल.
CO4. भाषेच्या विनिमयाच्या विविध रूपांचे विश्लेषण करता येईल.
CO5. बातमी लेखन ,भाषण संहिता लेखन ,संवाद लेखन/ मुलाखत लेखन ,अर्ज व पत्रलेखन या लेखनरूपांचे मूल्यमापन करता येईल.
CO6. भाषिक कौशल्यांच्या उपयोजनांची हातोटी प्राप्त झाल्यानंतर त्याचा सर्जनशील व नाविन्यपूर्ण लेखनतंत्रासह व्यावसायिक वापर करता येईल.
PSO’s:
१. व्यक्तिमत्वाची संकल्पना, त्याचे स्वरूप आणि जीवनातील व्यक्तिमत्त्व विकासाचे स्थान आणि महत्त्व समजून घेण्यास मदत होईल.
२.व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक घटक शोधले जाऊ शकतात.
३. व्यक्तिमत्व विकासात भाषेचे स्थान आणि महत्त्व समजण्यास मदत होईल.
CO’s:
१. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी प्रेरित केले जाईल.
२. व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्व अधोरेखित करण्यात मदत होईल.
३. जीवनातील व्यक्तिमत्व विकासाचे स्थान आणि महत्त्व सांगता येईल.
४. व्यक्तिमत्वाची संकल्पना आणि त्याचे स्वरूप कळेल.
५. भाषा कौशल्ये दैनंदिन जीवनात प्रभावीपणे वापरली जाऊ शकतात.
६.व्यक्तिमत्व विकासामध्ये भाषेच्या वापराचे मूल्यमापन केले जाऊ शकते.
द्वितीय वर्ष कला (S. Y.B.A.)G2 चे Outcomes पुढीलप्रमाणे
सत्र १ भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कादंबरी [CC – 1 C (3)] G2/ सत्र २ भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार:ललितगद्य [CC-1D (3)]
CO1. कादंबरी या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेता येईल.
CO2. नेमेलेल्या कादंबरीचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता येईल.
CO3. भाषिक कौशल्यविकास करता येईल.
CO4. ललितगद्य या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेता येईल.
CO5. नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील ललितगद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता येईल.
CO6. भाषिक कौशल्यविकास करता येईल.
द्वितीय वर्ष कला (S.Y. B.A.) S1 चे Outcomes पुढीलप्रमाणे
सत्र १ आधुनिक मराठी साहित्य : प्रकाशवाटा [DSE 1 A (3)]/सत्र २ मध्ययुगीन मराठी साहित्य: निवडक मध्ययुगीन गद्य,पद्य
CO1. आत्मचरित्र साहित्यप्रकाराचे स्वरूप, संकल्पना समजावून घेईल.
CO2. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या प्रेरणा आणि वाटचाल यांची ओळख करून घेईल.
CO3. ललित गद्यातील अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे वेगळेपण समजावून घेईल.
CO4. नेमलेल्या या आत्मचरित्राचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करेल॰
S2 सत्र १ साहित्यविचार [DSE 1B (3) ] / सत्र २ साहित्य समीक्षा [DSE 2 B(3)] चे Outcomes पुढीलप्रमाणे
CO1. भारतीय आणि पाश्चात्य साहित्यविचाराच्या आधारे साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजनविचार समजून घेता येईल.
CO2. साहित्याची निर्मितिप्रक्रिया समजावून घेता येईल.
CO3. साहित्याची भाषा आणि शैली विषयक विचार समजावून घेणे समजावून घेता येईल.
CO4. साहित्य समीक्षेची संकल्पना, स्वरूप यांचा परिचय करून घेता येईल.
CO5. साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध समजावून घेता व अभ्यासता येईल.
CO6. साहित्यप्रकारानुसार समीक्षेचे स्वरूप समजावून घेता व अभ्यासता येईल.
CO7. ग्रंथ परिचय, परीक्षण व समीक्षण यातील फरक समजावून घेता येईल.
द्वितीय वर्ष कला (S.Y.B.A.)
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम
सत्र १ प्रकाशनव्यवहार आणि संपादन [SEC 24 (2)]/सत्र २ उपयोजित लेखनकौशल्ये [SEC 2 B (2)] चे Outcomes पुढीलप्रमाणे-
CO1.प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करता येतील.
CO2. प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेता येईल.
CO3. प्रकाशनव्यवहार आणि संपादन यासाठी प्रात्यक्षिकासह उपयोजनाची कौशल्ये प्राप्त करता
येतील.
CO4. जाहिरात, मुलाखत लेखन आणि संपादन यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करता येतील.
CO5. जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यासाठी आवश्यक प्रशिक्षण प्राप्त करता येईल.
CO6.जाहिरात, मुलाखतलेखन आणि संपादन यासाठी प्रात्यक्षिकासह उपयोजनाची कौशल्ये प्राप्त करता येतील.
CO7.प्रकाशन संस्था, जाहिरात संस्था, छापखाने, वृत्तपत्र कार्यालये, वितरण संस्था, ग्रंथ विक्री दुकाने, फ्लेक्सनिर्मिती केंद्र, वार्ताहर यांना भेटी देऊन प्रशिक्षण घेता येईल.
द्वितीय वर्ष कला (S. Y. B.A.)
सत्र १ मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये [MIL 2 (2)]/ सत्र २ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी (MIL 2 (2)] चे Outcomes पुढीलप्रमाणे–
CO1. प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करता येतील.
CO2. प्रसारमाध्यमांतील संज्ञापनातील स्वरूप आणि स्थान स्पष्ट करता येतील.
CO3. व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करता येतील.
CO4. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्पर संबंध स्पष्ट करता येतील.
CO5. प्रसारमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करता येतील.
CO6. संज्ञापनातील नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे स्वरूप आणि स्थान स्पष्ट करता येईल.
CO7.भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे, समाजमाध्यमांचे परस्परसंबंध स्पष्ट करता येईल.
CO8. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करता येईल.
CO9. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयक साक्षरता निर्माण करता येईल.
CO10 नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचा वापर आणि परिणाम याबद्दल चर्चा करता येईल.
तृतीय वर्ष कला
सत्र १ कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये : भाग -१ [ SEC2 C (2) ]/ सत्र २ कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये : भाग २ [ SEC2D (2) ] चे Outcomes पुढीलप्रमाणे-
CO1. कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार समजून करेल.
CO2. कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये प्राप्त करेल.
CO3.कार्यक्रम संयोजनातील लेखन कौशल्ये
CO4. कार्यक्रम संयोजनातील लेखन कौशल्ये संपादन करेल.
CO5. कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये प्राप्त करेल.
CO6. आभासी कार्यक्रमांचे भाषिक कौशल्ये संयोजन करेल.
CO7.. निमंत्रणपत्र व निमंत्रणपत्रिका लेखन करता येईल.
तृतीय वर्ष कला (T. Y. B.A.) G3 नियमित अभ्यासक्रम चे Outcomes पुढीलप्रमाणे
सत्र १ भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : प्रवासवर्णन [CC-1E (3) ]/ सत्र २ भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कविता [CC-1F (3) ]
CO1. मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये आत्मसात करता येईल.
CO2.प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजने, वैशिष्ट्ये आणि वाटचाल समजून
घेता येईल.
CO3. नेमलेल्या प्रवासवर्णनाचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता येईल.
CO4. मराठी साहित्य, भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार यांची माहिती घेता येईल.
CO5. कविता या साहित्यप्रकाराचे स्वरूप, वाटचाल, प्रेरणा, प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, समजून घेता
येईल.
CO6. नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील निवडक कवितांचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता
CO7.कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषा रूपांची अभ्यासपुस्तकातील कवितांच्या आधारे ओळख करून घेता येईल.
तृतीय वर्ष कला (T. Y. B.A.)S3 चे Outcomes पुढीलप्रमाणे–
सत्र १ मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास : प्रारंभ ते इ.स. १६०० [DSE 1 C (3+1)]/ मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास : प्रारंभ ते इ.स. १६०१ ते इ.स. १८१७ [DSE 1 D (3+1)]/
CO1.वाङ्मायेतिहास संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजून घेता येईल.
CO2.मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेता येईल.
CO3.मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेता येईल.
तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) S4 चे Outcomes पुढीलप्रमाणे –
सत्र १ वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग १ [DSE 2 C (3)+1]/ सत्र २ वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग २ [DSE 2 D (3) +1]
CO1 भाषा स्वरूप, वैशिष्ट्ये व कार्ये समजावून घेता येतील.
CO2 भाषा अभ्यासाची आवश्यकता स्पष्ट करता येतील.
CO3 भाषा अभ्यासाच्या शाखा आणि विविध पद्धतींचा थोडक्यात परिचय करून घेता येईल.
CO4 वागिन्द्रियाची रचना, कार्य आणि स्वननिर्मितीची प्रक्रिया समजावून घेता येईल.
CO5 स्वनविज्ञान, स्वनिमविचार आणि मराठीची स्वनिमव्यवस्था समजावून घेता येईल.
CO6 रूपविन्यास आणि मराठीची रूपव्यवस्था समजावून घेता येईल.
CO7. वाक्यविन्यास आणि वाक्यव्यवस्थेचा मराठी भाषेच्यासंदर्भात परिचय करून देता येईल.
CO8.अर्थविन्यास या संकल्पनेचा भाषावैज्ञानिक अंगाने परिचय करून देता येईल.
सत्र १ कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये : भाग -१ [ SEC2 C (2) ]/ सत्र २ कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये : भाग २ [ SEC2D (2) ] चे Outcomes पुढीलप्रमाणे–
CO1.कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार समजून घेता येईल.
CO2.कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये प्राप्त करता येईल.
वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग २ – ४ [DSE 2 D (3) +1]
CO3.रूपविन्यास आणि मराठीची रूपव्यवस्था समजावून घेता येईल
CO4. अर्थविन्यास या संकल्पनेचा समजावून घेता येईल.
CO5. वाक्यविन्यास आणि वाक्यव्यवस्थेचा भाषावैज्ञानिक अंगाने परिचय घेता येईल.
S. Y. B. Sc. (द्वितीय वर्ष विज्ञान) सत्र १ उपयोजित मराठी (AECC-2A)/
/ सत्र २ मराठी साहित्य (AECC – 2 B)(वैचारिक, सामाजिक, विज्ञानविषयक) चे Outcomes पुढीलप्रमाणे–
CO1 मराठी भाषा, साहित्य आणि यांच्या परस्परसंबंधाची जाणीव करून देता येईल.
CO2मराठी भाषेचा परिभाषासापेक्ष आणि शैलीसापेक्ष विकास विद्यार्थ्यांच्या लक्षात तपशील आणून देता येईल.
CO3 मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्ये विकसित करता येतील.
CO4 साहित्यविषयक अभिरूची विकसित करता येईल.
CO5 मराठी भाषा, साहित्य आणि यांच्या परस्परसंबंधाची जाणीव करून देता येईल.
CO6 साहित्यविषयक अभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करता येईल.
CO7 विज्ञानसाहित्यविषयक आकलनक्षमता वाढवता येईल.